इस्रायल-पॅलेस्टाईनमधील रक्तरंजित संघर्ष सुरू; काय म्हणाले होते वाजपेयी? व्हिडीओ व्हायरल

atal bihari vajpayee - Maharashtra Today

नवी दिल्ली : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सध्या रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. इस्रायलने गाझाच्या सीमेवर सैन्य उभे केले आहे. तर गाझा येथील पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. त्यानंतर भारताने त्याचा निषेध नोंदवला आहे. इस्रायल-पॅलेस्टाईनच्या संघर्षावर माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाची भूमिका काय असावी, हे स्पष्ट केले होते. आज इस्रायल-पॅलेस्टाईनमधील रक्तरंजित संघर्ष सुरू झालेला आहे. वाजपेयींच्या या संघर्षावरील भाषणाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. एका जाहीर सभेतील हा व्हिडीओ आहे. यामध्ये वाजपेयी यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईनबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. यावरून त्या काळातही इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष शिगेला पोहचलेला असल्याचे दिसून आले. “अरबांच्या ज्या जमिनीवर इस्रायलने कब्जा केला आहे, ती जमीन खाली करावी लागेल. आक्रमणातून मिळालेल्या फायद्याचा उपभोग घ्यावा, हे आम्हाला आमच्या संबंधात मंजूर नाही. जो नियम आमच्यावर लागू आहे, तो इतरांवरही लागू आहे. अरबांची जमीन त्यांना दिलीच पाहिजे. जे पॅलेस्टाईन आहेत, त्यांच्या उचित अधिकाराची पुन:स्थापना झालीच पाहिजे.” असे वाजपेयी या व्हिडीओत सांगत आहेत.

भारताची भूमिका

भारताने इस्रायल-पॅलेस्टाईनच्या संघर्षावर चिंता व्यक्त केली आहे. शेख जर्रा आणि सिल्व्हान प्रदेशातील पॅलेस्टाईन लोकांना हुसकावून लावण्याबाबत भारतही तितकाच चिंतित आहे. भारताने सर्व पक्षांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आणि सुरक्षा परिषदेच्या ठराव २३३४ चे पालन करण्याचे आवाहन केले. ज्यात असे म्हटले की, १९६७ पासून पूर्व जेरुसलेमसह पॅलेस्टाईनच्या ताब्यात घेतलेल्या हद्दीत इस्रायलने अन्य वस्त्या उभारण्यास कायदेशीर मान्यता नाही. त्याचबरोबर, दोन देशांचा तोडगा काढणे आणि चिरस्थायी शांतता आणण्यात हा एक मोठा अडथळा आहे. यामधील दोन देशांनी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button