किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, अनुपम खेर यांनी शेअर केली भावनात्मक पोस्ट

Maharashtra Today

अनुपम खेर (Anupam Kher) यांची पत्नी अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर (Kirron Kher) यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या सार्वजनिक ठिकाणी दिसत नव्हत्या आणि नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनालाही त्या उपस्थित नव्हत्या. त्यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेस सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हा भाजपने त्यांच्या अनुपस्थितीचे कारण जाहीर केले होते. त्यानंतर किरण खेर यांच्या प्रकृतीविषयी बॉलिवूडमध्ये चर्चा सुरु झाली होती. मात्र ही चर्चा अफवेचे रूप घेऊ नये म्हणून स्वतः अनुपम खेर यांनीच एक भावनात्मक पोस्ट टाकत किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याचे जाहीर केले आहे.

३१ मार्च रोजी खासदार किरण खेर यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हा प्रदेश भाजपा अध्यक्ष अरुण सूद (Arun Sood) यांनी काँग्रेसला उत्तर दिले. त्यांनी किरण खेर यांना कॅन्सर झाल्याचे सांगितले. पुढे त्यांनी माहिती दिली की, ‘गेल्या वर्षी ११ नोव्हेंबरला किरण खेर चंडीगढ येथील घरात पडल्या आणि जखमी झाल्या. यात त्यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यांना त्यांना पीजीआईएमईआर हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. तेव्हा त्यांना मल्टीपल मायलोमा (Multiple Myeloma) आजार असल्याचे समोर आले. हा आजार त्यांच्या हातात पसरला आहे. त्यानंतर त्यांना ४ डिसेंबर रोजी मुंबईला हलवण्यात आले होते. यानंतर बॉलिवूडमध्ये विविध चर्चांना उधाण आले तेव्हा अनुपम खेर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी लिहिले आहे, ‘अफवांमुळे परिस्थिती आणखी बिघडते. त्यामुळेच मी आणि सिकंदर तुम्हाला माहिती देतो की, किरण खेर मल्टिपल मायलोमाशी झुंज देत आहेत. हा ब्लड कॅन्सरचाच एक प्रकार आहे.’

अनुपम खेर यांनी पुढे लिहिले आहे, ‘किरण खेर यांच्यावर सध्या उपचार सुरु असून मला पूर्ण विश्वास आहे की ती लवकरात लवकर या आजारातून बरी होईल. त्यांच्यावर उत्तमोत्तम डॉक्टर उपचार करीत आहेत हे आमचे भाग्यच आहे. ती एक फायटर असून प्रत्येक संकटाचा तिने निकराने सामना केलेला आहे. आणि त्यातून ती बाहेरही आली आहे. ती खूप चांगल्या स्वभावाची असल्याने तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तुम्ही सगळ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करा. ती लवकरच बरी होणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी तुमचे खूप खूप आभार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button