गोरगरीब जनतेचे आशीर्वाद दादांच्या पाठीशी आहेत ;अजित पवारांच्या प्रकृतीसाठी जावयाकडून साकडं

Ajit Pawar

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. ते मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अजित पवार लवकर बरे व्हावे यासाठी सर्वच पक्षातील नेते प्रार्थना करत आहेत. अजित पवार यांचे आत्तेजावई आणि भाजप आमदार राहुल कुल यांनीही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त आणि नियोजनमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त कळाले. राज्यातील गोरगरीब जनतेचे आशीर्वाद दादांच्या पाठीशी आहेत, अजितदादा लवकरच कोरोनावर मात करुन पुन्हा जनसेवेत कार्यरत व्हावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना !” अशी फेसबुक पोस्ट राहुल कुल यांनी लिहिली आहे.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांच्या सख्ख्या आत्या आहेत. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील राजे निंबाळकर या घराण्याचं मोठं प्रस्थ आहे. हे कुटुंब उस्मानाबादच्या पाटील कुटुंबीयांशी संबंधित आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही उस्मानाबादच्या पाटील कुटुंबातील सदस्य आहेत. वडगाव निंबाळकर येथील विजयसिंह उर्फ कुमारराजे निंबाळकर हे त्यांचे चुलत बंधू आहेत. तर कांचन कुल या विजयसिंहांच्या कन्या आहेत. कांचन कुल या राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. राहुल कुल यांनीही काही महिन्यांपूर्वी कोरोनावर मात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER