खा. संजय मंडलिकांना लाखो रुग्णांचा आशिर्वाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

CM Uddhav Thackeray

कोल्हापूर : दहा ग्रामीण रुग्णालये व दोन उपजिल्हा रुग्णालयाच्या सक्षमीकरणाबद्दल लाखो रुग्ण खासदार संजय मंडलिक यांना भरभरुन आशिर्वाद देतील. खा. मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्या अशा सर्व उपक्रमांना भविष्यात आपला भक्कम पाठींबा असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी केले.

कोरोना (Corona) संसर्गाच्या पार्श्वभुमीवर अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधाने युक्त सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानाचा लोकार्पण सोहळा ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कागल, मुरगूड, राधानगरी, गारगोटी, सोळांकूर, आजरा, चंदगड, नेसरी, गगनबावडा व खुपिरे गडहिंग्लज आणि वळीवडे येथील आरोग्य केंद्रातून आमदार आणि पदाधिकारी ऑनलाईन पध्दतीने या सोहळ्यात सहभागी झाले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, खा. मंडलिक यांनी स्वत: कोरोनाचे उपचार घेत असूनही गैरहजेरीत रुग्ण सेवा देण्याचा उपक्रम राबविला. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे विचार व सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून सेवा देण्याचे व्रत हे संजय मंडलिक यांनी हाती घेतले आहे. फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी राज्यभर केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यातून दर्जेदार आरोग्य सेवा दिल्या जात आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा उपयोग कायम स्वरुपी यंत्रणा उभी करताना होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला प्रस्ताव पाठवावा.

यावेळी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. प्रकाश आबिटकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आ. राजेश पाटील जिल्हाधिकारी दौलत देसाई माजी आमदार चंद्रदीप नरके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमख आदींसह अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER