अर्णव गोस्वामी अटक : अमित शहा म्हणाले हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावर हल्ला

Amit Shah

नवी दिल्ली : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी(anvay naik suicide case) रिपब्लिक वृत्तवाहिनीचे (Republic TV editor ) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab goswami) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावर हल्ला असून यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे’ अशी संतप्त प्रतिक्रिया शहांनी दिली.

आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून अटक केली आहे. त्यांना चौकशीसाठी अलिबागला नेण्यात येणार आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. अमित शहा यांनीही या प्रकरणावरून ट्वीट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

‘काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणणारे कृत्य केले आहे. राज्य सरकारने आपल्या सत्तेचा गैरवापर करुन अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई केली आहे’, अशी टीका शहा यांनी केली.

तसंच, ‘सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारिता आणि एका व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. पत्रकारितेवर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे’, असंही शहा म्हणाले. त्याचबरोबर, पत्रकारितेवर झालेल्या या हल्ल्याचा अमित शहा यांनी निषेध व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER