‘ऑक्सिमीटर’चा काळाबाजार; काँग्रेसच्या नेत्याला अटक !

Black market of Oximeter - Congress leader Yatindra Verma Arrested

इंदूर : कोरोनाच्या (Corona) साथीच्या काळात ज्या उपकरणांची मागणी वाढली आहे त्यात शरीरातल्या ऑक्सिजनची पातळी मोजणाऱ्या ‘ऑक्सिमीटर’चाही (Oximeter) समावेश आहे. आता याचा काळाबाजार सुरू झाला आहे. इंदूर येथे ऑक्सिमीटरचा काळा बाजार करताना काँग्रेसच्या (Congress) स्थानिक नेत्याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

आरोपी यतींद्र वर्मा (Yatindra Verma) हा काँग्रेसचा नेता आहे. तो ऑक्सिमीटरचा काळाबाजर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचला. पोलिस ग्राहक बनून त्याच्याकडे गेले. वर्मा या सापळ्यात अडकला.

कुटुंबातील सदस्य आजारी आहे, असे सांगून बनावट ग्राहकाने यतींद्रकडे ऑक्सिमीटरबाबत विचारणा केली. ज्या ऑक्सिमीटरची किंमत दोन हजार रुपये आहे त्याची किंमत यतींद्रने सात हजार सांगितली. सौदा पक्का झाल्यावर तो ऑक्सिमीटर घेऊन सांगितलेल्या ठकाणी आला. पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली. यतींद्र वर्माचे सोशल मीडियावर राहुल गांधींसोबत फोटो आहेत. त्यांने शिवराज सिंग सरकारविरोधात अनेक वक्तव्य केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button