ब्लॅक फंगसनंतर आता ‘व्हाइट फंगस’चा प्रादुर्भाव; सर्वाधिक धोका कोणाला?

Black Fungus - White Fungus

कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत बऱ्याच रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. केंद्र आणि राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाचा सामना करत आहे. मात्र, अशा वेळी ‘म्युकरमायकोसिस’ अर्थात ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. आतापर्यंत या आजारामुळे महाराष्ट्रात ९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७०० जणांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ‘ब्लॅक फंगस’पाठोपाठ आता ‘व्हाइट फंगस’चे (White Fungus) रुग्णही आढळून येत आहेत. यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेपुढे आणखी एक नवे आव्हान उभे आहे.

बिहारच्या पटना वैद्यकीय रुग्णालयात पांढर्‍या बुरशीचे चार रुग्ण आढळले आहेत. संक्रमित रुग्णांपैकी एकामध्ये पाटण्यातील प्रसिद्ध तज्ज्ञदेखील आहेत.

‘व्हाइट फंगस’मुळे रुग्णांच्या त्वचेवर परिणाम दिसून येते, उपचार घेण्यास उशीर झाल्यास रुग्ण दगावण्याची भीती PMCAच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. सिंह यांनी व्यक्त केली आहे. यामुळे कोरोना रुग्णांना किंवा कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसून येतात काय, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे.

व्हाइट फंगस हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त घातक आहे. फफ्फुसातील संसर्ग याचे मुख्य कारण आहे. सोबतच व्हाइट फंगस हा त्वचा, नख, तोंडाचा आतील भाग, किडनी, गुप्तांग, मेंदूवरही घातक परिणाम करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या रुग्णांचे सिटी स्कॅन केले जाते. रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला की व्हाइट फंसग? हे ओळखणे कठीण आहे. अशा रुग्णांच्या कोरोना चाचण्याही निगेटिव्ह येतात. पण सिटी स्कॅनमध्ये कोरोनासारखी लक्षणे दिसून येत असतील तर कफचे कल्चर केल्यानंतर ‘व्हाइट फंगस’ ओळखला जाऊ शकतो.

कोणत्या रुग्णांना सर्वाधिक धोका?
ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोना रुग्णांना ‘व्हाइट फंगस’ची लागण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशांना जास्त लागण होत आहे. त्याचबरोबर मधुमेह, एन्टीबायोटिक, स्टेरॉईड्सचा जास्त वापर करणाऱ्यांवर ‘व्हाइट फंगस’चा प्रादुर्भाव होत आहे. नवजात बाळांमध्ये डायपर कॅन्डीडोसिसच्या रूपात ‘व्हाइट फंगस’ची लागण होते, ज्यात क्रिम रंगाचे पांढरे डाग दिसून येतात. लहान मुलांमध्ये हा ओरल थ्रस्ट करतो. तर महिलांमध्ये हा ल्यूकोरियाचे मुख्य कारण आहे.

‘व्हाइट फंगस’ संसर्ग कसा रोखणार?
व्हाइट फंगसच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी वापरले जाणारे उपकरण स्वच्छ आणि विषाणूमुक्त असावेत. ऑक्सिजन सिलेंडर ह्युमिडिफायरसाठी स्टराईल वॉटरचा वापर केला जावा.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button