शरद पवारांच्या बारामतीत नगरपालिकेवर पहिल्यांदा फडकले काळे झेंडे!

Baramati

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बारामतीत (Baramati) पहिल्यांदा नगरपालिकेवर काळे झेंडे फडकविण्यात आले आहे .

नगरपालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून शुक्रवारी आंदोलन करून काळे झेंडे दाखवले. दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बोनस मिळावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.

आज (शुक्रवार) आंदोलनाचा दुसरा दिवस असून त्यांनी नगराध्यक्षा किंवा नगरसेवकांपैकी कोणीही भेटायला आलं नाही. त्यामुळे नगरपालिका कर्मचारी आणखी संतप्त झाले. त्यांनी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे फडकवून आंदोलन केले घोषणाबाजी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काल या कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आल आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER