बेळगावात आज काळा दिवस पाळणार

Black day will be observed in Belgaum today

बेळगाव : केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना मराठी भाषिक भाग कर्नाटकात समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ आज रविवारी संपूर्ण सीमाभागात काळा दिन (Black day )पाळण्यात येणार आहे. कोरोनामुळे यंदा सायकल फेरी आणि जाहीर सभा होणार नाही. पण, महाराष्ट्र एकीकरण समितीसह मराठी संघटना सकाळी 10.30 ते दुपारी 2 पर्यंत धरणे आंदोलन करणार असून गावागावांत अन्यायाविरोधात निदर्शने होणार आहेत. त्याशिवाय यंदा प्रथमच महाराष्ट्र मंत्रिमंडळ दंडाला काळ्या फिती बांधून निषेध करणार असून, महाराष्ट्रवासीयांनीही काळ्या फिती लावून सीमावासीयांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

1 नोव्हेंबर 1956 रोजी तत्कालीन केंद्र सरकारने बेळगावसह संपूर्ण मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्यामुळे या विरोधात आगडोंब उसळला आणि गेल्या 64 वर्षांपासून सीमाभागात केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करत काळा दिन पाळण्यात येतो. यंदा कोरोना महामारीमुळे सायकल फेरी आणि जाहीर सभेला परवानगी मिळालेली नाही. तरीही सीमावासीयांनी आपल्या भावना, मराठी अस्मिता दर्शवण्यासाठी नियमांचे पालन करून निषेध नोंदवावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER