बेळगावात काळा दिवस : पोलिसांनी केली नाकेबंदी

Black day in Belgaum

बेळगाव : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दरवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस (Black day) म्हणून पाळला जातो. बेळगावसह सीमावर्ती मराठीबहुल भाग कर्नाटकात टाकल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो. या दिवशी निषेध फेरी व सभाही होतात. कोरोना महामारीमुळे यंदाची निषेध सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. त्याऐवजी मराठा मंदिर येथे धरणे आंदोलनास प्रशासनाने परवानगी दिली. परवानगी देत असताना लोकांनी आंदोलन स्थळांपर्यंत पोहचू नये, यासाठी पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर केला. आज सकाळपासून पोलिसांनी नाकेबंदी (Police blockade) करून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी केली. लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. इतकेच नाही तर काळे कपडे घालून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला.

बेळगावसह कर्नाटकातील ८६५ गावांतील नागरिकांना संयुक्त महाराष्ट्रात यायचे आहे. महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी रोखले. आंदोलन ठिकाणी पोलिसांनी त्यांना जाण्यास मज्जाव केला. पोलिसांकडून दडपशाहीचा निषेध केला. एकावेळी केवळ ५० लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. टप्प्याने आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या मराठी भाषिकांची कोंडी केली. पोलिसांच्या या मुस्कटदाबीचा तीव्र संताप व्यक्त होत असून हे धरणे आंदोलन दुपारी २ वाजेपर्यंत चालणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER