राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने हाताला काळ्या फिती लावून केला कर्नाटक सरकारचा निषेध

black-day-belgaum-black-ribbon-protest-aginst-karnataka-government-by-ncp-ministers-jayant-patil-at-sangali

मुंबई : कर्नाटकमधील (Karnataka Belgaum issue) सीमावासियावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मैदानात उतरले आहे . त्यांनी हाताला काळ्या फिती लावून निषेध केला. महाराष्ट्रतील राष्ट्रवादीचे सर्व नेते, कार्यकर्ते आज हाताला काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध करत आहे.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जात आहे. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष , जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या हाताला काळी फित बांधून कामकाजाला सुरुवात केली आहे.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस (Black Day)पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा 1 नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या सर्व पदाधिकारी, युवक, युवती, इतर सेल व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, 1 नोव्हेंबर रोजी आपणही काळ्या फिती बांधत सीमाभागातील मराठी बांधवांना आपला पाठिंबा द्यावा. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज बुलंद करू, दडपशाहीचा धिक्कार करू’ असे म्हणत जयंत पाटील यांनी आवाहन केले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER