पंढरपुरमध्ये भाजपचा विजय हा ठाकरे सरकारविरोधातील कौल – समाधान आवताडे

Samadhan Awatade - Uddhav Thackeray - Maharashtra Today

सोलापूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर भाजपच्या समाधान आवताडे यांनी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके पराभवाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. आपल्या संभाव्य विजयावर समाधान आवताडे यांनी प्रतिक्रिया देत पंढरपुरचा विजय हा ठाकरे सरकारविरोधात जनतेने दिलेला कौल असल्याचे म्हटले आहे.

यावेळी आवताडे म्हणाले की, आमचा विजय निश्चित आहे. फक्त औपचारिक घोषणा तेवढी बाकी राहिली आहे. आम्ही त्याची वाट बघतोय. त्यानंतर सविस्तर भूमिका मांडेल. प्रशांत पारिचारिक आणि पंढरपुरातील जनतेने संपूर्ण ताकद दिली होती. हा जनतेचा विजय आहे. जनतेने ठाकरे सरकारविरोधात कौल दिला आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे. विजय आमचाच होणार आहे.

यावेळी प्रशांत पारिचारक यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. आमचा विजय झाला आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. त्यामुळे उतावीळ न होता थोडं संयमाने घेणं आवश्यक आहे. ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती. त्याचाच विजय बघायला मिळतोय. राज्य सरकारची सगळी यंत्रणा या ठिकाणी कामाला लागली होती. तरीसुद्धा लोकांपुढे आम्ही एकत्र गेलो. लोकांना विश्वास दिला. या तालुक्यात आम्ही गेले ३० ते ४० वर्षे काम केलं. सगळ्याच कार्यकर्त्यांनी विजयी होण्याचा निर्धार केला होता. त्यामुळेच हा विजय झाला आहे. विरोधकांना निकालाने उत्तर दिलं आहे. मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button