सदाभाऊंची मनधरणी करण्यात भाजपला यश, पुणे पदवीधर निवडणुकीतून ‘रयत’ची माघार

Sadabhau Khot - Chandrakant Patil

सांगली :- नाराज असलेल्या सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांची मनधरणी करण्यात अखेर भाजपला (BJP) यश आले आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेने माघार घेत, भाजपचे उमेदवार संग्रामसिंह संपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप समोरील मतविभाजनाचा संभाव्य धोका टळलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यात सोमवारी रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीत रयतने आपला उमेदवार मागे घ्यावा असा निर्णय झाला. रयत क्रांती संघटनेकडून कोल्हापूरचे प्राध्यापक एन. डी. चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एक बैठक पार पडली. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) कुठल्याही प्रकारचा लाभ होईल अशी कुठलीही भूमिका रयत घेणार नाही. आम्ही भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना निवडून आणण्यासाठी जोमाने काम करु, असं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलं. .

दरम्यान, भाजपमध्ये सदाभाऊ खोत यांना मानाचे स्थान आहे. यापुढील काळात पक्षात आणि सत्तेमध्येही रयत आणि सदाभाऊ यांना सन्मान देण्यात येईल, आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सदाभाऊ खोत यांच्यावर विशेष प्रेम आहे, असं मतही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेणार नाही; राजू शेट्टींनी सदाभाऊंना सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER