ढोंगी सरकारविरुद्ध भाजपाचा धडक मोर्चा

BJP

नागपूर :- हे ढोंगी सरकार आहे, मुंबईत आलेल्या आदिवासींच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचे आंदोलन सांगून आदिवासींची दिशाभूल करते आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते आज (सोमवारी) भंडारा येथे आयोजित भाजपाच्या धडक मोर्चापुढे बोलत होते.

हे सरकार भ्रष्ट
आजचा मोर्चा पाहून सरकारचे डोळे उघडलीत एवढे लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. मला कोणी विचारले ठाकरे सरकारची सर्वात प्रभावी योजना कोणती तर माझे उत्तर आहे, माल कमवा. वाळू, दारू आणि इतर अनेक व्यवसायात हे सरकार भ्रष्टाचार करते आहे. आम्ही कधीच धान खरेदी थांबविली नाही, कधीच धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकविले नाही. मात्र, हे सरकार धान खरेदीत भ्रष्टाचार करते आहे, याची चौकशी झाली तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे अर्धे नेते जेलमध्ये जातील, असे फडणवीस म्हणालेत.

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी या सरकारने अवघे १६ कोटी रुपये दिले. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. आम्ही एक एक तालुक्याला त्यापेक्षा जास्त भरपाई दिली होती. आणि हेच (उद्धव ठाकरे) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगायचे हेक्टरी 50 हजार द्या. आता का देत नाही?

वीज ग्राहकाला सूट नाही, बिल्डर्सवर मेहरबानी

गरीब वीज ग्राहकाला सूट देण्यात किती कोटी लागतात? शेतकऱ्यांना वीज बिलात सूट देण्याची घोषणा केली होती. गरिबांना वीज बिलात सूट न देणारे हे सरकार मुंबई, पुण्यातील बिल्डर्सला ५ हजार कोटीचे प्रिमियम देते! तिन्ही पक्षाचे मंत्री त्या पैशाची वाटणी करून घेतात, असा आरोप फडणवीस यांनी कला.

त्या मृत्यूंसाठी तुम्ही जबाबदार

भंडारा रुग्णालयातील आगीबाबत ज्या अधिकाऱ्यांना निलंबित केले त्यांना दोनच दिवसात वर्ध्यात पोस्टिंग देता! जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा. भंडाऱ्यातील रुग्णालयात गेलेले जीव अपघातात नाही तर तुमच्या चुकांमुळे घडलेले मृत्यू आहेत, अशी टीका फडणवीसांनी केली.

ही बातमी पण वाचा : मुंबईतील शेतकऱ्यांच्या मोर्चाला कुणाचाही पाठिंबा नाही, मग ही ढोंगबाजी का? : फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER