आज राष्ट्रवादीकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम, असंख्य समर्थकांसह कल्याण काळेंचा पक्षप्रवेश

Maharashtra Today

पंढरपूर : मंगळवेढा-पंढरपुर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालकेंना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून मतदार संघाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपा नेते व सहकार शिरोमणी साखर करखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे (Kalyan Kale) हे ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. शिवाय मतदारसंघात काही ठिकाणी सभाही घेणार आहेत. या दौऱ्यात आणखी काही प्रवेश व मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याने अजित पवारांच्या (Ajit Pawar)या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात होत आसलेल्या पोटनिवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर येऊन पोहचला आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपाचे प्रमुख नेते मतदारसंघात मुक्कामाला असून प्रचार करीत आहेत. तर राष्ट्रवादीकडून ही या पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पक्ष निरिक्षक सुरेश घुले, आ. संजय शिंदे, दीपक साळुंखे, उमेश पाटील आदी मतदारसंघात ठाण मांडून आहेत. आता त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर ला दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात कल्याणराव काळे यांच्यासह काही प्रमुख नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. शिवाय काही नाराजांना ही अजित पवार कामाला लावतील. पंढरपूर, मंगळवेढा शहरांसह काही प्रमुख मोठ्या गावात प्रचार सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.

गुरुवारी सकाळी 9 वाजता अजित पवार पंढरपूरमध्ये दाखल होत असून श्रेयस पॅलेस मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कल्याणराव काळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button