भाजपच्या शौमिका महाडिक यांचे कोरोनावर पत्र व्ह्यायरल

Shovik Mahadik

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ आणि भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांचे वडील तसेच माजी खासदार धनंजय महाडिक यांचे काका माजी आमदार महादेवराव महाडिक (आप्पा) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याचबरोबर त्यांच्या पत्नी आणि माजी आमदार अमल महाडिक यांनाही कोरोनाची लागण झाली. यावर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहत आभार मानले आहे.

शौमिका महाडिक यांनी फेसबुक पोस्ट करत म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून आपल्यासाठी म्हणावा तसा वेळ देता आला नाही त्याबद्दल सर्वप्रथम माफी मागते. नेहमी काही महत्वाचा विषय असेल, भूमिका मांडायच्या असतील तर मी असा एखादा लेख लिहून कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. आज तसं काही विशेष कारण नाही. पण या महिन्याभरात घरचे काही सदस्य कोरोनाबाधित झाल्याने जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना, हितचिंतकाना काळजी लागून राहिली होती. प्रत्येकाचे फोन घेणे, मेसेजेसना रिप्लाय करणे शक्य नसल्याने सर्वांना एकत्रित संदेश देण्यासाठी या माध्यमातून संवाद साधते आहे.

आपल्याला कल्पना आहे की मागच्या महिन्यात पहिल्यांदा आप्पांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांची तब्बेत अगदी ठणठणीत होती. त्यांची तब्बेत अगदी ठणठणीत होती पण तरी काळजी लागलेली असतेच. त्यातून आम्ही सावरतो न सावरतो तेवढ्यात पुढच्या २-४ दिवसात आईंचासुद्धा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तरी वेळेवर निदान झाल्याने व योग्य उपचार घेतल्याने दोघांनाही कसला त्रास नव्हता. वरचेवर डॉक्टरांशी बोलणं सुरूच होतं. या सगळ्या गोंधळामध्ये आप्पांची विचारपूस करण्यासाठी म्हणून लोकांचे इतके फोन येत होते की सगळ्यांना उत्तर देऊन अक्षरशः मी थकून गेले, पण तुमचे प्रेम पाहून तितकाच मानसिक आधारही मिळाला..

आप्पा आणि आई बरे होऊन १- २ दिवसांत घरी परतणारच होते इतक्यात अमल साहेबांना त्रास सुरू झाला. चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह! साहेबांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले. या मधल्या काळात थोडी घाबरले होते पण मनात भीती असली तरी मुलं लहान असल्याने त्यांच्यासमोर धीट राहणंही गरजेचं होतं.. अश्या दुहेरी परिस्थितीशी तोंड देण्यातच हा पूर्ण महिना निघून गेला.

खासगी आयुष्यात संकटे आली तरी सामाजिक जीवनामध्ये पक्षाचं माझ्याकडे असलेलं पद, जिल्हा परिषद सदस्यत्व याही जबाबदाऱ्या झटकून चालणार नव्हतं. त्यामुळे शक्य होईल तसं या गोष्टींकडेही लक्ष देत होते. महिनाभर थोडी ओढाताण झाली हे खरं आहे पण आता शेवटी सगळेच बरे होऊन सुखरूप घरी परतले आहेत. सगळं काही पुन्हा सुरळीत झालं यासाठी देवाचे आभार मानावेत तितके थोडे आहेत!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER