पंढरपुरातील अटीतटीच्या लढतीत भाजपचे समाधान आवताडे विजयी, राष्ट्रवादीचा पराभव

Samadhan Autade

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपने (BJP) प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव करत महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे ३ हजार ७३३ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वत: लक्ष घातलं होतं. मात्र तरीही भालकेंचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत अखेर समाधान आवताडे यांनी बाजी मारली. भाजप आणि राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीनेही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील असे सर्वच मोठे नेते येथे प्रचाराला उतरले होते. त्याचाच फायदा इथे समाधान आवताडेंना झाला. राष्ट्रवादीकडूनही उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीतले अनेक नेते येथे तळ ठोकून होते. मात्र राष्ट्रवादीच्या या प्रचाराचं यशात रुपांतर झालं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button