केसरकर शिवसेनेत आयत्या बिळावर नागोबा, राणेंवरच्या टीकेला भाजपाचे उत्तर

Deepak Kesarkar - Rajan Teli

सिंधुदुर्ग : ज्याची मुख्यमंत्री कार्यालयात ‘स्टाफ’ म्हणून काम करण्याची पात्रता नाही, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले, या शब्दात शिवसेनेचे दीपक केसकर (Deepak Kesarkar) यांनी टीका केली होती. यावर भाजपाचे (BJP) माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) केसकरांवर टीका करताना म्हणाले, केसरकर शिवसेनेत आयत्या बिळावर नागोबा आहेत.

प्रकरण असे – दीपक केसकर यांचे मंत्रीपद गेल्याने ते नाराज आहेत. या संदर्भात माध्यमाशी बोलताना केसकर यांनी त्यांचे जुने प्रतिस्पर्धी आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली. म्हणाले – मी नारायण राणेंविरुद्ध लढलो आणि माझी ताकद दाखवली, तेव्हा सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या मला ऑफर होत्या. उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. असे कोणीच करत नाही. ज्यांनी पदं दिलेत त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायला हव.

ज्याची साधी मुख्यमंत्री कार्यालयात ‘स्टाफ’ म्हणून काम करण्याची पात्रता नाही, अशा माणसाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केले. ते आज उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात, त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची पात्रता आहे का? असे केसरकर म्हणाले.

यावर भाजपाचे सरचिटणीस आणि माजी आमदार राजन तेली यांची दीपक केसरकरांवर टीका केली. म्हणालेत, नारायण राणेंमध्ये कुवत होती म्हणून त्यांना शिवसेनेत पदे मिळाली. केसरकरांमध्ये कुवत नसल्यामुळे शिवसेनेने राज्यमंत्रीपदही काढून घेतले. केसरकर शिवसेनेत आलेले आयत्या बिळावर नागोबा आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER