भाजपाचे रमेश कराड शिवसेनेत जाणार होते … , संभाजी पाटील निलंगेकर यांचा दावा

Ramesh Karad - Sambhaji Patil Nilangekar

लातूर : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने (Shiv Sena) लातूर (Latur) ग्रामीणच्या जागेचा आग्रह धरल्यामुळे भाजपाचे (BJP) नेते रमेश कराड (Ramesh Karad) शिवसेनेत जाणार होते. मात्र ऐनवेळी शिवसेनेने उमेदवार बदलला, त्यामुळे कराड यांचा सेनाप्रवेश टळला, असा दावा भाजपायाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केला आहे.

रमेश कराड भाजप सोडणार होते, तेव्हाच…

२०१४ च्या निवडणुकीत रमेश कराड हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून भाजपायाचे उमेदवार होते. त्यांना ९३ हजार मतं मिळाली होती. सात – आठ हजार इतक्या कमी फरकाने ते हारले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सेना-भाजपची युती होती. त्यावेळी कराड यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना शिवसेनेने या जागेसाठी निकराचा आग्रह धरला. युती टिकवण्यासाठी रमेश कराड यांना भाजपा सोडून शिवसेनेकडून लढवण्याचा निर्णय झाला. त्यांना आम्ही शिवबंधन बांधण्यास सांगितले, कराड पक्षप्रवेश करणारच होते त्याचवेळी सचिन देशमुख यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे कराड यांचा सेनाप्रवेश टळला, असा दावा निलंगेकर यांनी केला आहे.

रमेश कराड हे विधानपरिषद आमदार (भाजपा) आहेत. ते पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. दोन वर्षांपूर्वी विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी मोठी खेळी केली होती. भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधानपरिषदेचं तिकीट मिळवले. मात्र अवघ्या पाच दिवसात त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला! त्यामुळे धनंजय मुंडे यांची मोठी कुचंबणा झाली होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीकडे उमेदवारच न उरल्याने अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती.

२०१८ मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातून विधानपरिषद जागेसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी माघार घेऊन भाजपाच्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER