नेहमी दुपारनंतर काम करणारे मुख्यमंत्री वाझेंसाठी एवढ्या बैठका का घेतात? भाजपचा प्रश्न

Sanjay Kute-Sachin Vaze-CM Thackeray Maharashtra Today

मुंबई :- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकेप्रकरणी निलंबित झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठकाचा धडाका कधी सुरू करणार, असा खोचक प्रश्न भाजप नेते संजय कुटे (Sanjay Kute) यांनी उपस्थित केला.

एरवी दुपारनंतर शासकीय कामकाजाला हात लावणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून बैठकामागून बैठका घेत आहेत. ही एक आश्चर्यजनक बाब आहे. वाझे यांच्यासाठी एवढ्या तत्परतेने ज्या बैठका घेतल्या जात आहेत, तशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार, असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्याचे कुटे यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला.

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेचे निकष बदलले. त्यामुळे राज्यातील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित झाले आहेत. नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी जेरीस आल्याचे त्यांनी सांगितले. सक्तीच्या वीज बिल वसुलीचे सुलतानी संकटही शेतकऱ्यांवर कोसळले आहे. विधानसभेत वीज बिल वसुलीस स्थगिती दिल्याचे आश्वासन दिल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवण्यात आली. महाविकास आघाडी सरकार किती दुटप्पी आहे हे यातूनच स्पष्ट होते. कोरोनाच्या नावाखाली सर्व प्रश्नांपासून पळ काढणारे हे सरकार प्रत्यक्षात कोरोना (Corona) परिस्थितीही आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरलेले आहे, अशी टीकाही संजय कुटे यांनी केली.

ही बातमी पण वाचा : वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; परमबीर सिंह, गृहमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची 4 तास चर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER