आता राठोडांच्या अटकेसाठी किती दिवस लावणार? भाजपचा प्रश्न

atul bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chauhan) आत्महत्याप्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली. चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अडचणीदेखील वाढू लागल्याने रविवारी संजय राठोड यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. गेल्या चार दिवसांपासून हा राजीनामा जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) असला तरी कोणतीही कार्यवाही न केल्यानं  काल भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.

यानंतर, आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या राजीनाम्यावर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली होती. राज्यपाल कार्यालयाने संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केल्याची माहिती दिली आहे. यामुळे, आता पूजा चव्हाण प्रकरणी पुढील तपास कसा होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजीनामा हे पहिलं पाऊल असून या प्रकरणाची योग्य ती चौकशी होईल.

पूजाला न्याय मिळायला हवा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते देत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा मंजूर करायला चार दिवस लावले, आता अटक करायला किती दिवस लावणार? असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी राठोडचा राजीनामा मंजूर करायला चार दिवस लावले, आता अटक करायला किती दिवस लावणार?’ असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER