भाजपचा दबाव वाढला, अधिवेशनापूर्वी संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता

Sanjay Rathore-BJP

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja chavan)मृत्यू प्रकरण आता चिघळू लागलेले आहे. विरोधकांकडून विविध आरोप होत असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढतच चालला आहे. संजय राठोड(Sanjay Rathore) यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारची नाचक्की होत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपने (BJP) सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आक्रमक होणार हे नक्की. संपूर्ण अधिवेशन संजय राठोड यांच्या मुद्दाने गाजण्याची शक्यता आहे.

संजय राठोड यांची सर्वात आधी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार असं बोललं जात आहे, मग हे सरकार कसली वाट बघतंय. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देणारं हे सरकार आहे. संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नाही, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

ही बातमी पण वाचा : मोटेरा स्टेडीयमला मोदींचे नाव : भक्तांनी पंतप्रधानांना अजूनच लहान केले आहे – शिवसेना 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER