राष्ट्रवादीत इनकमिंगला सुरुवात ; भाजप सोडत प्रकाश काळे हाती बांधणार घड्याळ

Sharad Pawar-Sudamarao Kale

देहूरोड : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुदामराव काळे (Sudamarao Kale) यांचे चुलत बंधू भाजपचे माजी देहूरोड शहर उपाध्यक्ष प्रकाश काळे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह पुन्हा राष्ट्रवादी पक्षात (स्वगृही) (NCP) परतत आहेत.

वॉर्ड क्र. 7 च्या हितार्थ 2008 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाने देहूरोड शहर उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्‍ती केली होती,

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवार असणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.

भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे त्रस्त झाल्याने राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, देहूरोड शहर अध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करीत आहेत.

ही बातमी पण वाचा : भाजपला पुन्हा धक्का ; दिग्गज नेत्या अस्मिता पाटील यांचा पक्षाला रामराम ; राष्ट्रवादी, शिवसेनेत प्रवेशाची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER