
ठाणे :- राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या सहकार पॅनेलनं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. सहकार पॅनेलनं २१ पैकी १८ जागा जिंकल्या आहेत. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर व भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे यांनी मतदारांचे यावेळी आभार मानले.
परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) या दोन्ही मंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र तरीसुद्धा बँकेच्या मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला नाही, असे भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले. सहकार पॅनलच्या गेल्या टर्ममधील कार्याला मिळालेली ही पोचपावती असून सहकार पॅनलमध्ये अनुभवी संचालक असून पुढील काळात बँक अधिक नावारूपाला नेण्याचे काम हे संचालक करतील, असा विश्वास संजय केळकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला ९, भाजपा ७ व अन्य २ असे सहकार पॅनलचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला