भाजपचे ‘मिशन मुंबई’ ; राजकीय हालचालींना वेग , नगरसेवकांची बोलावली महत्त्वाची बैठक

Maharashtra Today

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी(BMC) कंबर कसल्याचे दिसते.

या पार्श्वभूमीवर भाजपने सर्व नगरसेवकांची बैठक बोलावल्याची माहिती आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.  एल.  संतोष यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या तयारीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक भाजपच्या वसंतस्मृती या कार्यालयात पार पडत आहे. सकाळी ९ वाजता या बैठकीला सुरुवात झाली आहे.

या बैठकीसाठी मुंबई महापालिकेतील प्रमुख नगरसेवक आणि मुंबईतील आमदार उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान नवी दिल्लीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  बैठक सुरू होती. तेव्हा राज्यात भाजपच्या राजकीय हालचाली सुरू  झाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button