भाजपाचे ‘मिशन मुंबई महापालिका’, नड्डांच्या मुंबईत तीन दिवस मुक्काम

J P Nadda-Mumbai Mahapalika

नागपूर :- हैदराबाद महापालिकेत दणदणीत यश मिळविल्यानंतर भाजपाने (BJP) आता मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवला आहे. पालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरवण्यासाठी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) तीन दिवस तळ मुंबईत ठोकून राहणार आहेत.

मुंबईतही (Mumbai) हैदराबादच्या ‘विजयाचा पॅटर्न’ राबवण्याची तयारी सुरू आहे, असे कळते. (BJP chief JP Nadda will visit mumbai for begins preparations for bmc elections) जेपी नड्डा १८ ते २० डिसेंबर मुंबईत राहणार आहेत. महाराष्ट्रासह मुंबईतील भाजपाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेणार आहेत. मुंबईतील भाजपाचे सर्व नगरसेवक, आमदार आणि खासदारांशीही चर्चा करतील. पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीने निवडणुकीची काय तयारी केली आहे याचाही आढावा घेतील.

हैदराबादमध्ये भाजपाचे अवघे चार नगरसेवक होते. त्याबळावर भाजपाने हैदराबादमध्ये ४९ नगरसेवक निवडून आणले. हैदराबादच्या पालिका निवडणुकीत वापरण्यात आलेले प्रचाराचे तंत्र, उमेदवारांची निवड, स्थानिक पातळीवरील समस्यांवरून उठवलेले रान आणि विभागनिहाय करण्यात आलेली बांधणी आदी गोष्टींचा मुंबई महापालिका निवडणुकीत उपयोग होऊ शकतो का, यावरही ते मुंबईतील नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

महापालिकेतील पक्षीय बलाबल शिवसेना ९४, भाजपा ८२, काँग्रेस २९, राष्ट्रवादी ८, समाजवादी पक्ष ६ आणि मनसे १

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER