भाजपचे मिशन केरळ : मेट्रोमॅन ई. श्रीधरन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर

E. Sreedharan

तिरुअनंतपुरम : भाजपने (BJP) आगामी केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला आहे. केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास ई. श्रीधरन (E. Sreedharan) हे मुख्यमंत्री असतील. ८८ वर्षांचे ई. श्रीधरन हे देशभरात मेट्रोमॅन म्हणून ओळखले जातात. गेल्याच आठवड्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच ई. श्रीधरन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. अखेर आज यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली सध्या केरळमध्ये ‘विजय यात्रे’च्या माध्यमातून धडाक्यात प्रचार सुरू आहे. पक्षाकडून लवकरच उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती के. सुरेंद्रन यांनी दिली. केरळच्या राजकारणाचा विचार करता तिथे सध्या डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे. तर, काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. भाजपनं गेल्या काही वर्षांपासून केरळमध्ये जोर लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यांना यश आलं नव्हतं. मेट्रोमॅन ई.श्रीधरन यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला किती फायदा होणार हे आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER