काळे कपडे,काळा मास्क घालून भाजपचे ” माझे अंगण हेच रणांगण” आंदोलन

BJP Protest

औरंगाबादः राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात महाराष्ट्राला वाचवण्यासाठी शुक्रवारी (ता.22) भाजपतर्फे महाआघाडी सरकारच्या विरोधात “माझे अंगण हेच रणांगण” आंदोलन करण्यात आले. सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान जिल्हा कार्यालयासमोर खासदार डॉ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश प्रवतक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, प्रवीण घुगे, कचरू घोडके, राम बुधवंत व पदाधिकारी यांनी काळी रिबीन बांधून, काळे कपडे, काळा मास्क परिधान करून सोशल डिस्टन्स ठेवत हे आंदोलन केले.

भाजपच्या जिल्हा कार्यालयासमोर आमदार-खासदार व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्य शासनाने महा संकटापासून बचाव करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. सरकार फेसबुकवर एक घोषणा करते व प्रत्यक्षात वेगळ्या शासन निर्णय निघतो. या तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांमध्ये समन्वय नाही. राज्याची जनता मरणाच्या दारात येऊन उभी आहे. असा आरोप आंदोलनाच्या वेळी करण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER