बेळगावात भाजपचे कमळ फुलले; काँग्रेसचा पराजय

Mangala Angadi

बेळगाव : खासदार सुरेश अंगडींच्या (Suresh Angadi) पत्नी मंगला अंगडी (Mangala Angadi) यांनी अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा पराभव केला. त्या बेळगावच्या खासदार झाल्या आहेत. काँग्रेसचे (Congress) सतीश जारकीहोळी यांचा मंगला अंगडी यांनी २ हजार ९०३ मतांनी पराभव केला. ही निवडणूक खूपच अटीतटीची झाली.

अगदी शेवच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. शेवटच्या तीन फेऱ्या असताना भाजपच्या मंगला अंगडी यांनी पुन्हा आघाडी घेतली होती. ३ हजार ५०० मतांनी आघाडीवर असलेल्या मंगला अंगडी यांनी अखेर २ हजार ९०३ मतांनी विजय मिळवला. त्यामुळे आता बेळगाववर भाजपचा झेंडा फडकला आहे.

बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण १० उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून मंगला अंगडी, काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके होते. कर्नाटक राष्ट्र समितीकडून विवेकानंद बाबू घंटी उमेदवार होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, गोकाक, रामदुर्ग, अरभावी, सौदत्ती यल्लमा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

ही मते निर्णायक ठरली
मंगला अंगडी यांना माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या गोकाक मतदारसंघात २६ हजार ८२६ व बेळगाव दक्षिणमध्ये २२ हजार ८५७ मतांची मिळालेली आघाडी सतीश जारकीहोळी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना अरभावी येथे १५ हजार ७४३ मते तर बेळगाव उत्तर भागात १२ हजार ७५९ मते आणि सौन्दत्ती येथे १६ हजार ५५९ मते मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button