शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अन्यथा राज्यभरात जेलभरो: बावनकुळेंची घोषणा

मुंबई :- राज्य सरकारने धमकी देत, पोलीस बळाचा वापर करुन शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खनदीत केला. फसवी कृषी संजिवनी योजना आणली. शेतकऱ्यांकडे 50 टक्के वीज बिल भरायला पैसे नाहीत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचा दावा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला. कोणताही वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांना वीज देता येते, असंही बावनकुळेंनी म्हटलं. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

राज्य सरकारने अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत दिलेली नाही. आतापर्यंत फक्त 20 टक्के शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप येत्या 23 तारखेपर्यंत आमदार, खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतर 24 तारखेला राज्यातील 287 ठिकाणी जेलभरो आंदोलनकरण्यात येणार असल्याची घोषणा बावनकुळेंनी केली. त्यामुळे वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता जेलभरो आंदोलनाची घोषणा बावनकुळेंनी केली.

राज्य सरकार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan Suicide Case) दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. संजय राठोड सध्या कुठे आहेत ते कुणाला माहिती नाही. पोलीस महासंचालक प्रेस रिलीज काढत नाहीत. सरकार एरवी ट्वीट करतं पण आता का करत नाही? बेपत्ता झालेला मंत्री कॅबिनेटमध्ये येत नाही, सरकारी निवासस्थानामध्ये नाही, यवतमाळमध्येही नाही. सरकार जाणिवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप बावनकुळेंनी केला.

पूजा चव्हाण (Pooja Chavan) प्रकरणाची चौकशी होणार असून या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने होणार? कोणत्या यंत्रणेमार्फत होणार? असे प्रश्न भाजपने केले. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी पूजा चव्हाण प्रकरणी काही प्रश्न उपस्थित करून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला. पूजाच्या आत्महत्याप्रकरणी ज्या काही बाबी समोर येत आहेत. त्या सर्वांची योग्य यंत्रणेकडून चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणाचं सत्य बाहेर काढणं ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी सरकारने अद्याप घेतली नसल्याचं दिसून येतं, असा आरोप भंडारी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER