सोलापुरात आंबेडकर आणि शिंदेंना मागे टाकत भाजपचे जय सिद्धेश्वर महाराज मारणार बाजी

सोलापूर : लोकसभा १७ वी, संपूर्ण देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागलेलं आहे.  यंदाही मोदी सरकारचाच बोलबाला असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रात प्रचारादरम्यान दिसणारा लोकांचा कल आणि प्रत्यक्ष निकाल यात मोठी तफावत दिसून येत आहे.

सोलापूर लोकसभेत यंदा खरी लढत ही वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यात असल्याचे बोलल्या जात होते; मात्र प्रत्यक्ष निकालाची आकडेवारी ही भाजपच्या जय सिद्धेश्वर महाराज यांच्या बाजूने आहे. सोलापूरकरांनी भाजपला कौल दिल्याचे चित्र आहे.

सिद्धेश्वर स्वामी २ लाख ३९ हजार २०५ मतांसह आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे १,७३,०१४ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ ७६,६३७ मतांसह प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

दलित, लिंगायत आणि कुणबी बहुसंख्य असलेल्या सोलापूर मतदारसंघाच्या तिरंगी लढतीकडे यावेळी सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते.

सोलापूर एकेकाळी शिंदेंचा गड मानला जायचा. तर भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यावेळी अकोल्यासोबत सोलापूरहूनही निवडणुकीस उभे राहिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात चांगलाच जोर लावला होता. मोठ्या प्रमाणात प्रचारही वंचितच्या नेत्यांनी या मतदारसंघात केला होता.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults