भाजपच्या भाडोत्री ट्रोलर्सने काँग्रेस नेत्यांना केवळ ट्रोल करण्याचे काम केले, नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं आहे. त्यात देशात सर्वत्र लसीची समान किंमत ठेवण्याची मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मनमोहन सिंग यांनी सतत पंतप्रधान मोदी, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना देशात उद्भवलेल्या कोरोनाच्या परिस्थितीबाबत वारंवार सचेत केले. पण त्यांच्या योग्य सूचनांकडे भाजपकडून फक्त उलट प्रतिक्रिया देण्यात आल्या. भाजपने त्यांच्या भाडोत्री ट्रोलर्सकडून आमच्या नेत्यांना ट्रोल करण्याचं काम केलं गेलं, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाची रूग्णसंख्या रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा मोठा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. त्यामुळे आजपासून राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. जनतेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. लॉकडाऊनचं लोकांकडून पालनही होईल आणि महाराष्ट्र देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य ठरेल, असा दावाही पटोले यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button