केंद्राकडून देण्यात आलेल्या मदतीची माहिती देण्यासाठी भाजपाची हायटेक रॅली

BJP

नागपूर : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकारने सर्व राज्यांकरिता २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारने केंद्राच्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आम्हाला मदत मिळत नसल्याचा कांगावा करत आहे. त्यामुळे केंद्राने जाहीर केलेल्या माहितीची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपाकडून हायटेक प्लॅन आखला गेला आहे. लॉकडाऊनमधून हळूहळू शिथीलता मिळत असताना आता भाजपाने मेगाप्लॅन तयार केला आहे. भाजपा आता राज्यभर लवकरच हायटेक रॅली सुरु करणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. या प्लॅननुसार, भाजपा राज्यातील पाच लाख कुटुंब आणि २५ लाख लोकांपर्यंत पोहोचून, केंद्राने महाराष्ट्राला दिलेल्या मदतीची माहिती देणार आहे.

ही बातमी पण वाचा:- शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चुनाळा येथील शेतकरी सरसावले, जनहित याचिका दाखल

तब्बल २५ लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने नियोजन केलं आहे. केंद्रातील पॅकेजमधून काय मिळालं आणि काय हवं याबाबत भाजपा व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. केंद्रातील आणि राज्यातील नेते या व्हर्च्युअल रॅलीद्वारे मार्गदर्शन लोकांना करून सविस्तर माहिती देणार आहेत. राज्यातील सहा विभागात ही व्हर्च्युअल रॅली घेण्यात येणार आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात लवकरच या रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्हर्च्युअल रॅलीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER