पणजी पालिकेवर पुन्हा भाजपाचा झेंडा, विरोधक साफ

Maharashtra Today
supporters waved the Lotus print flags during PM Narendra Modi road show in Varanasi northern Indian state of Uttar Pradesh; Shutterstock ID 1385470790; Purchase Order: FIX0007020 ; Project: year in review; Client/Licensee: encyclopedia britannica

गोवा : गोव्याची राजधानी पणजी (panjim ) महानगरपालिकेसह (panjim municipal corporation election 2021) ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपा (BJP) पुरस्कृत गटाने जोरदार मुसंडी मारत बहुमतासाठी लागणारा आकडा भाजपाने पार केला, पणजी मनपावर झेंडा फडकावला. काँग्रेस पुरस्कृत गटासह अपक्षांचा धुव्वा उडाला.

पणजी महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. ३० जागांसाठी निवडणूक झाली होती. आतापर्यंत ३० पैकी २१ जागांचा निकाल जाहीर झाला आहे. १६ जागांवर भाजपा पुरस्कृत ‘प्रोग्रेस फॉर टूगेदर’ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. बहुमतासाठीचा १६ जागांचा आकडा भाजपाने गाठला आहे त्यामुळे पणजी महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनचा भाजपाने जोरदार आघाडी घेतली होती व ही आघाडी आता विजयामध्ये रुपांतरीत होते आहे.

कोरोनामुळे लांबलेल्या स्थानिक निवडणूक आता होत आहेत. गोव्यात महापालिका, ६ ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेच्या एका प्रभागासाठी मतमोजणी सुरू आहे.

णजी महानगरपालिकेसह डिचोली, पेडणे, वाळपई, कुडचडे, कानकोन आणि कुंकळी या नगरपालिकांची मतमोजणी सुरु आहे. साडेआठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून ११ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. पणजी महानगरपालिका आणि सहा नगरपालिकांच्या ४२१ जागांसाठी निवडणूक झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER