‘भाजपचा भेसळयुक्त, तर शिवसेनेचा भगवा शिवरायांचा’, राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis-Sanjay Raut

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. २०२२ साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचं नाव न घेता भाजपच्या कार्यकारिणी बैठकीतून लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपने जर इतिहास चाळला तर, भाजपला कळेल की, शुद्ध भगवा कोणाचा आहे. आमचा भगवा हा शिवरायांचा आहे. तो शुद्ध आहे. साध्य भाजपाही भगव्याच्या प्रेमात पडली आहे. मात्र त्यांचं हे भगवा प्रेम केवळ सत्तेसाठी आहे. त्यांचा भगवा भेसळयुक्त असल्याने मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकवायचा हे जनताच ठरवेल. मुंबईत भाजपचा भेसळयुक्त झेंडा नाही तर शिवसेनेचा शुद्ध शिवरायांचा भगवा फडकेल, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

यावेळी ते म्हणाले की, मुंबई पोलिसांची बदनामी करणारी एक नटी भाजपची कार्यकर्ती आहे. मुंबईला पायपुसणी करण्याचा दिल्लीचा प्रयत्न आहे. मात्र त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. सध्या ट्विटरयोध्ये शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत कोणाचे हिंदुत्व खरे आहे, हे जनताच ठरवेल, असेही राऊत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER