आधी आजार मग सत्कार ही भाजपची दुटप्पी भूमिका; नाना पटोलेंची टीका

Nana Patole

मुंबई :- केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) सत्तेत येऊन सात वर्षे पूर्ण झालेत. यावरून काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजप (BJP) सरकारची दुटप्पी भूमिका आहे. देशातील गरिबांनी मरावे आणि श्रीमंतांनी जगावे हीच मोदी सरकारची इच्छा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांनी टीव्ही माध्यमाशी बोलताना मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. कोरोनावर वेळीच उपचार झाले असते तर अनेकांचे जीव गेले नसते. पण मोदी सरकारने टाळ्या-थाळ्या वाजवून देशवासीयांना अंधश्रद्धेच्या खाईत ढकलले. गरिबांनी मरावे आणि श्रीमंतांनी जगावे ही मोदींची इच्छा आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

पंचतारांकित हॉटेलमध्ये लसीकरणाची भूमिका भाजपची आहे. बड्या उद्योगपतींचे ६८ हजार कोटी रुपये केंद्र सरकार भरत आहे. पंचतारांकित घोटाळा भाजपाच्या रक्तात आहे. रेमडेसिवीर बॅन असल्याचे WHOने सांगितल्यास मोदी सरकारने आपल्या मित्रांसाठी ते वितरित केले. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा ताबा केंद्राने घेतला. टाक्या साफ नव्हत्या. यामुळे ब्लॅक फंगससारखे आजार निर्माण झाले, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

मराठा-ओबीसी आरक्षण हा केंद्राचा विषय
ओबीसी आणि मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा केंद्राचा विषय असून याच्या स्पष्ट गाईडलाईन्स आहेत. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता आरोप करत आहेत. “पटोलेंची आधीची भाषणे ऐका. खोटं बोला पण रेटून बोला हा त्यांचा अजेंडा आहे.” अशी टीका फडणवीसांनी केली. घटनादुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेला नाही. केंद्राने निर्णय घेतल्यास काहीच अडचण होणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मग ओबीसी आणि मराठा समाजाला त्रास का दिला जात आहे? भाजपला राज्यातील जनता कधीच माफ करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button