कर्नाटकमधील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व; काँग्रेस, जेडीएसचा धुव्वा

BJP Flags

बंगळुरु : एकीकडे महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणे, पॅनल उभे करणे आदीची लगबग सुरू  असताना शेजारील कर्नाटकमध्ये आज ५,७६२ ग्रामपंचायतींवर कोणाचे राज्य असणार याचे  निकाल हाती येऊ लागले आहेत. कर्नाटकमधील ५,७२८ ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यांत  मतदान झाले होते.

दोन टप्पे  मिळून ७२, ६१६ जागांसाठी ८१ टक्के मतदान झाले होते. ८,०७४ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या सत्रात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेस आणि जनता दलाचे (सेक्युलर) आव्हान होते.

भाजपने कर्नाटकमध्ये ८० टक्के जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलांनुसार भाजप ३,४३० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस व जनता दलाने अनुक्रमे १५८५ आणि ५९५ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे तूर्तास या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER