भाजपचा अपेक्षाभंग : भाजपच इनकमिंग रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यश

Balasaheb Sanap - Uddhav Thackeray

नाशिक :- भाजपच्या (BJP) वाटेवर असलेले शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांना शिवसेनेतच (Shiv Sena) रोखून धरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना यश आल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी सानप यांनी चर्चा केली असून त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. शिवाय त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याने ऐन नाशिक पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात होणारी बंडाळी थोपविण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. शिवाय सानप यांना पक्षात आणण्याचा भाजपचा अपेक्षाभंग झाल्याच राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

ही बातमी पण वाचा : नेपाळमधील हिंदुत्व संपवलं जात असताना आपण काय केले? – शिवसेना

राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर पराभवाला सामोरे जावं लागल्याने सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. नाशिकच्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सानप यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. शिवाय नाशिक पालिकेतील भाजपच्या सत्तेला सानप सुरुंग लावतील अशी आशा होती. पण त्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे सानप हे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणात नव्हते. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi) आल्याने तीन पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार आहेत. त्यामुळे नाशिक पालिकेतील सत्ता हातातली जाण्याची शक्यता असल्याने सानप यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सानप यांची भेट घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. यावेळी नाशिक महापालिकेच्या अनुषंगाने चर्चा झाली असून उद्धव ठाकरे यांनी सानप यांच्याकडे मोठी जबाबदारी देणार असल्याचं सांगितलं. महापालिका निवडणुकीच्या जबाबदारीसह महामंडळाचं अध्यक्षपद देण्याचं आश्वासन ठाकरे यांनी सानप यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सानप हे पंचवटीमध्ये राहतात. या भागात एकूण 24 नगरसेवक असून यात शिवसेनेचा केवळ एकच नगरसेवक आहे. त्यामुळे सानप यांच्या माध्यमातून पंचवटीतून अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची शिवसेनेची रणनीती असल्याचंही सांगण्यात येतं. या भागातील मनसे आणि भाजपचं आव्हान मोडून काढण्यासाठी सानप चांगली भूमिका वठवू शकतात, त्यामुळेच त्यांच्यावर पक्षाकडून अतिरिक्त जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER