नागपूर महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी ; काँग्रेस उमेदवाराचा पराभव

bjps-dayashankar-tiwari-wins-as-nagpur-mayor

मुंबई : नागपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या (nagpur municipal corporation) निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. महापौरपदी भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी (Dayashankar Tiwari ) यांची निवड झाली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी हे विजयी झाले आहेत. त्यांना १०७ म्हणजेच पूर्ण मते मिळाली.

त्याच्या विरोधात काँग्रेसच्या, आमदार विकास ठाकरे यांच्या गटाचे रमेश पुणेकर यांना २७ मते तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना १० मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे. दरम्यान दयाशंकर तिवारी हे प्रभाग क्रमांक-१९ चं नेतृत्व करतात. महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली आहे.

त्यामुळे आता उर्वरित १३ महिन्यांच्या कालावधीसाठी तिवारी यांना महापौरपदाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा ऑनलाईन पद्धतीनं ही निवडणूक घेण्यात आली. सर्व सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER