ढिसाळ कारभाराचे पुन्हा बळी; ठाकरे सरकार हे तुम्हीच करून दाखवलं, भाजपची बोचरी टीका

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांच्या मृत्यूची भीषण दुर्घटना ताजी असतानाच, गुरुवारी मध्यरात्री भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये कोरोना उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत १२ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर पाच रुग्ण गंभीर जखमी आहेत. शिवाय दोन मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात होते.

सदर घटनेवरुन भाजपाने ट्विट करत ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली. भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले…ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं, अशी टीका भाजपाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER