कांजूरमार्ग कारशेडचे काम थांबवण्याचे भाजपाचे कारस्थान; नवाब मलिकांचा आरोप

- जागेच्या मालकीचा वाद

Nawab Malik

मुंबई :- कांजूरमार्ग कारशेड हा मुंबईच्या दोन लाईनला जोडणारा प्रकल्प असून २० लाख लोकांना त्याचा फायदा होणार असल्याने हे काम थांबण्यासाठी भाजपाकडून कटकारस्थान सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला.

आरेला पर्याय म्हणून मेट्रो कारशेडसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा केला आहे. ही जागा आमच्या मालकीची असून, ती मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष निर्माण होण्याचे लक्षण दिसत आहेत.

केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. या पत्रात मेट्रो कारशेडची जागा राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली ती जागा मिठागरांसाठी आहे आणि आता ती कारशेडला चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे असे म्हटले आहे. याआधी मिठागराच्या बर्‍याच जागा राज्य सरकारला केंद्राने २००२ साली वर्ग केल्या आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

भाजपाचे लोक सुरुवातीला ही खासगी जागा आहे असे सांगत होते आणि आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे असे सांगत आहेत. यावरून भाजपाच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER