भाजपला मोठा धक्का : शिरोमणी अकाली दलाचा एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय

PM Modi

नवी दिल्ली : केंद्रातल्या नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सरकारने बहुमताच्या आधारे शेतकी विधेयक मंजूर केल्यानंतर सर्वच स्तरांवरून विरोध केला जात आहे. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून आता शिरोमणी अकाली दलाने मोठा निर्णय घेतला आहे. अकाली दलाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाने गेल्या अनेक वर्षांची मैत्री तोडत केंद्रातल्या एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेनंतर भाजपशी काडीमोड घेणारा अकाली दल हा भाजपचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. केंद्र सरकारने आणलेली कृषी विधेयके ही शेतकरीविरोधी आहेत.  त्यामुळे ती मागे घेतली जावीत अशी मागणी अकाली दलाने केली होती. त्यावरून पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलनही उभं राहिलं आहे. त्यामुळे पक्षाची अडचण होऊ नये म्हणून अकाली दलाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांना किमान आधारभूत किंमत देण्याची हमी न दिल्याने शिरोमणी अकाली दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडत आहे. केंद्र सरकारची पंजाबी आणि शिखांच्या मुद्द्यावरही असंवेदनशीलता सुरू आहे, असेही अकाली दलाने म्हटले आहे. दरम्यान, अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी केंद्र सरकारचा पाठिंबा काढण्यावर मात्र कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही. भाजपला पूर्ण बहुमत असल्याने केंद्र सरकारला कुठलाही धोका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER