भाजपाचा मुख्यमंत्री बंगालच्या मातीतलाच असेल – अमित शहा

Amit Shah

कोलकाता : भाजपाला एकदा संधी द्या, आम्ही सोनार बांगला बनवू. भाजपाचा विजय झाल्यास बंगालच्या मातीतलाच मुख्यमंत्री देऊ, असे आश्वासन गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बंगालच्या मतदारांना दिले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणालेत, काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्याचा भाजपा निषेध करते. मी वैयक्तिक त्याचा निषेध करतो. हिंसाचाराचे उत्तर लोकशाही पद्धतीनं देणार असल्याचे आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे.

निवडणुकांमध्ये आम्ही त्यांचा पराभव करून दाखवू. भाजपाचा विजय झाला तर पुढील मुख्यमंत्री हा पश्चिम बंगालच्या मातीतलाच असेल. अशा हल्ल्यांमुळे  भाजपाची गती मंदावेल किंवा भाजपाचे कार्यकर्ते थांबतील या भ्रमात तृणमूल काँग्रेसने राहू नये. तुम्ही जेवढे हिंसक वातावरण तयार कराल तेवढीच भाजपा बंगालमध्ये आपली स्थिती मजबूत करण्याचे काम करेल. हिंसाचाराला आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने उत्तर देऊ, असे ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ३०० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे.

या प्रकरणांच्या तपासातही काहीही प्रगती दिसत नाही. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी जे पैसे दिले ते सर्व गायब झाले. सीएजी ऑडिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात का धाव घेतली जात आहे. भ्रष्टाचार झाला म्हणूनच पळवाट शोधली जात आहे. आपल्याच माणसांनी तो भ्रष्टाचार केल्यामुळे तृणमूलची त्यांना पकडण्याची हिंमतही होत नाही, असे ते म्हणाले. टीएमसी आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुवेंदु अधिकारी यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मी त्यांचे स्वागत करतो. अन्यायाच्या विरोधात ज्यांना आवाज उठवायचा आहे त्यांनी भाजपात यावे. काल आमचे सर्व पोस्टर्स फाडण्यात आले. परंतु आज मोठ्या प्रमाणात लोक जमलेत, मी लोकांचा आभारी आहे, असे शहा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER