संकटकाळात भाजपची ‘ठाकरे’ सरकारला मोठी मदत, ५० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्याची घोषणा

pravin darekar - Uddhav Thackeray - Maharastra Today

दमण :- महाराष्ट्रात कोरोनाचा कहर एवढा वाढला आहे की आता रुग्णांना बेड्स, औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाच्या उपचारात महत्वाचे समजले जाणारे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अश्या संकटकाळात भाजप ‘ठाकरे’ सरकारला मोलाची मदत करणार आहे. तब्बल ५० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन देण्याची घोषणा भाजपने केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. रेमडेसिव्हीर इंजेक्शन घेण्यासाठी हे दोन्ही नेते थेट दमण येथील फार्मा कंपनीत दाखल झाले.

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

दुसरीकडे, पुण्यात आज संध्याकाळपर्यंत पाच हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची रेमडेसिव्हीरची चिंता तूर्तास मिटणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने यासंदर्भात माहिती देत पुणेकरांना मोठा दिलासा दिला. रुग्णसंख्येच्या प्रमाणात कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. सध्या पुण्यात जवळपास ७० टक्के रेमडेसिव्हीर इंजेक्शनची कमतरता आहे. परंतु रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत होण्यास किमान पाच दिवस लागण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा : इथं सामान्य जनतेला इंजेक्शन मिळत नाहीत,  रोहित पवारांना कुठून मिळाले ?  निलेश राणेंचा सवाल 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button