भाजपकडून अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न, गिरीश महाजनांनी घेतली दुसऱ्यांदा भेट

Anna Hazare - Girish Mahajan

अहमदनगर : बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) नेत्यांकडून अण्णांच्या मनधरणीसाठी प्रयत्न केले जात आहे. आज सकाळी भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले. भल्या सकाळीच महाजन यांनी राळेगणसिद्धी गाठून अण्णांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे सहा दिवसांपूर्वीही महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.

आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मागील 2 महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. अशा परिस्थितीत जर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची चिंता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे.

आज सकाळी गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. अण्णांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री सोबत बैठक झाली असून काही निर्णय घेण्यात आले. कृषी माल भाव ठरवणारी उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या निर्णयाचे पत्र गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले. अण्णांनी आंदोलन करु नये अशी केली विनंती, महाजन यांनी अण्णांना केली. उद्या (शुक्रवार) केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER