
सांगली : मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाचे अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze arrested) यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Goverment) आणि भाजपा (BJP) यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आरोप केला – हा भाजपाचा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
पत्रकार परिषदेत भाजपावर टीका करताना पटोले म्हणालेत, विरोधक महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आले तेव्हापासून हे सुरू आहे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल ती करावी. विरोधक डबल ढोलकी वाजवायचे काम करत आहेत. त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला