दार उघड उद्धवा, दार उघड! तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या

BJP-CM Thackeray

मुंबई :- कोरोनामुळे जाहीर झालेला लॉकडाऊन ठाकरे सरकार (Thackeray Govt) टप्प्याटप्प्याने शिथिल करत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहे. मात्र धार्मिळ स्थळे सुरू करण्याची मागणी करण्यात येत असली तरी सरकारने अद्याप तरी धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही.

या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले (Tushar Bhosle) यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ‘दार उघड उद्धवा, दार उघड!’ म्हणत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

‘राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. साधू-संतांचा आवाज ऐकायला हे सरकार तयार नाही. साधू-संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा पत्रं  पाठवली. पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग आणत आहे’, अशी टीका तुषार भोसले यांनी केली. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER