दूध दरवाढीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी भाजपचे आंदोलन

Mahadev Jankar

मुंबई : दूध उत्पादक संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने राज्यभरात दूध दरवाढीच्या (BJP’s agitation) मागणीसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणित सापडला आहे.अशा परिस्थितीत दुधाचा उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान याआधी मंत्रालयात बैठकही झाली, मात्र दुधाच्या दरावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतक-यांनी राज्यभरात आज ठिकठिकाणी आंदोलनाला सुरूवात केली आहे. राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष भाजप या आंदोलनाचे नेतृत्त्व करीत आहेत.

पुण्यातील मावळ येथे दूध दरवाढीच्या (milk price hike) मागणीसाठी चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) नेतृत्वाखाली नायगाव येथील शासकीय दूध संकलन केंद्राबाहेर आंदोलनसुरू आहे.

पंढरपूरमध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वात चंद्रभागा नदीच्यापात्रात विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून आंदोलन करण्यात येत आहे.

रयतक्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नामदेव पायरीजव विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून सरकारचा निषेध करण्यात येत आहे.

जालन्यात रयत क्रांती संघटनेने परतूर शहरात मारुतीला दूध अभिषेक करुन एल्गार आंदोलन पुकारले आहे. दुधाला 10 रुपये दरवाढ मिळालीच पाहिजे, रयत क्रांती संघटनेचा विजय असो अशी घोषणाबाजी देत आंदोलनाला सुरूवात झाली आहे.

औरंगाबादमध्ये पहाटेच आंदोलनाला सुरूवात झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रतिकात्मक दगडांना दूध अभिषेक घालून आंदोलन करत आहेत. तसेच जिल्ह्यातील डोणगावातही दगडांना अभिषेक व शेतकऱ्यांकडून गावातील ग्रामदैवत गणपती बाप्पालाही दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात येत आहे.

काय आहेत शेतक-यांच्या मागण्या –

प्रति लिटर दुधाला 10 रु अनुदानाची मागणी. 30 रुपये दुधाला हमी भाव द्या. बाहेरुन आयात होणारी दुध पावडर बंद करा अशा प्रमुख मागण्यांसह राज्यभरात दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER