शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपचा फायदा, खेड पंचायत समितीत अविश्वास ठराव मंजूर

Khed Panchayat Samiti - Maharashtra Today

पुणे : खेड पंचायत समितीत सुरू असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणामुळे भाजपला फायदा झाला आहे. पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरुध्द भाजपने दाखल केेलेला अविश्वास ठराव भाजपच्या बाजूने मंजूर झाला आहे. आकरा विरुध्द तीन अशा मतांनी भाजपने हा ठराव मंजूर करवून घेतला. त्यामुळे आता भाजपचे उपसभापती सभापती पदी नेमले जाऊ शकतात.

२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या ठरावाला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी समर्थन जाहीर केले होते. या ठरावावर आज पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागिय अधिकारी विक्रांत चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी त्यांनी सभागृहात अविश्वास ठराव मांडला. यावर आजी माजी सभापती, उपसभापती व सदस्यांनी मते मांडली. हात वर करून मतदान घेण्यात आले. ठरावाच्या बाजून ११ जणांनीं हात वर केले. भगवान पोखरकर, अमोल पवार, ज्योती आरगडे यांनी ठरावाच्या विरोधी मतदान केले. अविश्वास ठरावासाठी प्रांत यांनी सकाळी ११ वाजता विशेष सभा पंचायत समिती सभागृहात बोलविली होती. तसेच सभापती भगवान पोखरकर यांना सभेत भाग घेण्यासाठी न्यायालयीन परवानगी मिळाली असल्याने पोलिस बंदोबस्तामध्ये त्यांना राजगुरूनगर येथे आणण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button