भाजपाचे १३-१४ आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील

Jayant patil

मुंबई :- भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याला उत्तर देताना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी धक्कादायक विधान करताना म्हटले आहे की, भाजपाचे चक्क १३-१४ आमदार आमच्या चांगल्या संपर्कात आहेत. मात्र पक्ष फोडण्याचे राजकारण आम्हाला जमत नसून सरकार टिकवणे यांच्याकडे आमचे जास्तीत जास्त लक्ष असल्याचे पाटील म्हणाले.

भाजपचे १३-१४ आमदार आमच्या चांगल्या संबंधात आहेत, त्यांची कामे आम्हाला करावी लागतात; कारण ते आमचे जुनेच सहकारी आहेत, असे म्हणत भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केला आहे. पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली. सत्तेसाठी भाजपा हपापलेला आहे. सत्तेत कधी जाऊन बसतो याची स्वप्नं भाजपा पाहात आहे. त्यासाठीच सरकार पडणार किंवा आमदार फुटणार अशा वावड्या उठवल्या जातात, असेही ते म्हणाले.

भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही त्यांनी चांगलाच टोला लगावला आहे. माजी वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात काहीही कामे केली नाहीत. त्यांनी जनतेला केवळ स्वप्नंच दिली, आताही आपले सरकार येणार या स्वप्नात ते असतात. त्यामुळे, आम्ही ‘मुंगेरीलाल के सपने’ यासारखे ‘मुनगंटीवार के सपने’ नावाने पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

पाच वर्षानंतर ‘मुनगंटीवार के सपने’ पुस्तक प्रकाशित करू – जयंत पाटील

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही त्यांनी चांगलाच टोला लगावला आहे. माजी वित्तमंत्री असलेल्या मुनगंटीवार यांनी त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात काहीही कामे केली नाहीत. त्यांनी जनतेला केवळ स्वप्नच दिली, आताही आपले सरकार येणार या स्वप्नात ते असतात. त्यामुळे, आम्ही ‘मुंगेरीलाल के सपने’ यासारखे ‘मुनगंटीवार के सपने’ नावाने पुस्तक प्रकाशित करणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितले.


Web Title : BJP’s 13 to 14 MLA in our contact jayant patil

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)